उदर व नितंब चिकटलेल्या अवस्थेतील सयामी जुळ्यांना शीतलने जन्म दिला होता. पण त्यांना खरे जीवनदान दिले ते परळच्या जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी. तीन महिन्यांपूर्वी अवघड शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी या जुळ्या भावांना वेगळे केले, मात्र जोपर्यत ते स्वत: उभे राहत नाहीत, पावले टाकत नाहीत तोपर्यंत डॉक्टरांना धाकधूक होती. पण डॉक्टरांच्या तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांना अखेरीस यश आलं असून लव्ह आणि प्रिन्स चक्क पावलं टाकू लागली आहेत. त्यानंतर १२ डिसेंबर २०१७ रोजी वाडिया रुग्णालयात दोघांवर शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळ करण्यात आलं. तब्बल १२ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. लव्ह व प्रिन्स यांचे पोट व नितंबच एकमेकांना जोडलेले नव्हते तर या दोघांमध्ये य़कृत, आतडे व मूत्राशय ही तीन इंद्रियही सामायिक होती. पण डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारलं. अखेरीस लव्ह व प्रिन्स यांना वेगळं करण्यात डॉक्टरांना यश आलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews